
सामना ऑनलाईन । मेलबर्न
कोहलीच्या नेतृत्वाखालील ‘विराट’ सेना ऑस्ट्रेलियाच्या भूमीत दाखल होताच कांगारूंची घाबरगुंडी उडाली आहे. ‘विराट’ सेनेला रोखण्यासाठी स्टीव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर या प्रमुख क्रिकेटपटूंची गरज असल्याचा साक्षात्कार आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाला (सीए) झाला आहे. स्मिथ-वॉर्नर यांच्यावरील बंदीची शिक्षा कमी करून ‘टीम इंडिया’ला रोखण्यासाठी त्यांना ऑस्ट्रेलिया संघात घेण्यासाठी ‘सीए’ने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. या संदर्भात पुढील आठवडय़ात त्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
गेल्या मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ व उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर कॅमरून बेनक्राफ्ट याच्यावरही नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे, मात्र स्मिथ-वॉर्नरच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलिया संघाला पराभवामागून पराभवाचे तोंड बघावे लागत आहे. त्यातच आता हिंदुस्थानसारखा बलाढय़ संघ ऑस्ट्रेलियाच्या स्वारीवर आल्याने ऑस्ट्रेलियाला स्मिथ-वॉर्नर जोडीची प्रकर्षाने गरज वाटू लागलीय. यावेळी हिंदुस्थानला ऑस्ट्रेलिया दौऱयावर विजय मिळविण्याची संधी असल्याची किक्रेट वर्तुळात चर्चा आहे. ऐन विश्वचषक स्पर्धेच्या तोंडावर मायदेशात पराभव झाल्यास क्रिकेट विश्वात आपली नाचक्की होईल हे ऑस्ट्रेलियाला कळून चुकले आहे. त्यामुळे ‘सीए’ने स्मिथ-वॉर्नर या दोन प्रमुख खेळाडूंना संघात घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील आठवडय़ात होणाऱया ‘सीए’च्या बैठकीकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष असणार आहे.
बंदी उठविण्यास मिचेल जॉन्सनचा विरोध
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची सध्याची कामगिरी निराशाजनक झालेली आहे. अशा स्थितीत संघात स्टीव्हन स्मिथ क डेव्हिड कॉर्नर यांचे पुनरागमन होणे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला महत्त्काचे काटत आहे, मात्र त्यांच्यावरील बंदी उठविण्याच्या प्रयत्नांना ऑस्ट्रेलियाचाच माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याने विरोध केला आहे. स्मिथ, कॉर्नर आणि कॅमरन बॅनक्रॉफ्ट यांच्याकर चेंडू कुरतडल्याप्रकरणी घालण्यात आलेली बंदी कायम ठेवावी अशी मागणी मिचेल जॉन्सनने केली आहे. या तिघांनीही बंदीकिरोधात कोणतीही याचिका दाखल केलेली नाही. त्यामुळे ती कायम राहाकी असे जॉन्सनचे म्हणणे आहे. ‘तिन्ही खेळाडूंनी बंदीचा निर्णय स्कीकारला आहे. त्यांनी त्याकिरोधात दाद मागितलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकरील बंदी कायम राहाकी असे मला काटते’ असे ट्विट जॉन्सनने केले आहे.




























































