‘फोर्ड’चा हिंदुस्थानातून काढता पाय, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेची वाहन बनवणारी कंपनी Ford मोटरने हिंदुस्थानात आपला उत्पादन प्लांट बंद केला आहे. यामुळे आता Ford Figo, Ford Freestyle, Ford Aspire, Ford Ecosport आणि Ford Endeavour यासारख्या हॅचबॅक आणि सेडानचे उत्पादन बंद होणार आहे. येत्या काळात हिंदुस्थानात याची विक्रीही बंद होणार आहे.

फोर्डची कार खरेदी करण्याची शेवटची संधी

सध्या हिंदुस्थानात विक्रीसाठी फोर्डच्या केवळ 1000 कार शिल्लक आहेत. जर तुम्हाला फोर्ड कार खरेदी करायची असेल तर त्वरा करा, कारण येणाऱ्या काळात या गाड्या हिंदुस्थानात उपलब्ध होणार नाहीत.

या कारणामुळे उत्पादन प्लांट केले बंद

फोर्ड कंपनी हिंदुस्थानात बऱ्याच काळापासून तोट्यात सुरू आहे. तसेच येथे उपस्थित फोर्ड प्लांट्सचाही योग्य वापर होत नव्हता. फोर्ड कारच्या विक्रीतही गेल्या काही वर्षांत लक्षणीय घट झाली आहे. येत्या काळात हिंदुस्थानात फोर्डच्या कम्प्लीट बिल्ड युनिट (CBU) कारची विक्री केली जाणार आहे. या हायब्रिड आणि इलेक्ट्रिक कार असतील.