हायवेवर वाहन चालवताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

5976

जर तुम्ही हायवेवर वाहन चालवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला हायवेवर वाहन चालवण्याबाबतच्या काही टिप्स सांगणार आहोत. ज्या तुमच्या खूप कामी येऊ शकतात. हायवेवर वाहन चालवणे हे सामान्य रस्त्यांवर वाहन चालवण्यापेक्षा वेगेळे असते. जेव्हा आपण हायवेवर वाहन चालवत असतो तेव्हा आपल्याला अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या हायवेवर गाडी चालवताना लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहेत.

टर्न सिग्नल

हायवेवर वाहन चालवताना दुसर्‍या बाजूला जाण्याआधी टर्न इंडिकेटर देणे आवश्यक असते. कारण यामुळे तुमच्या वाहनाच्या मागे चालत असलेल्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजूला वाहन वळवणार आहोत हे कळते.

गतीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे

हायवेवर वाहनाची गती नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. कारण जर आपण हायवेवर कमी गतीत वाहन चालवित असाल, तर कदाचित वेगाने मागून येणारे वाहन आपल्या वाहनास धडकू शकते. म्हणून हायवेवर वाहन चालवताना एक गती निश्चित करा ( 80-100 प्रति किमी वेग ) आणि त्याच वेगाने वाहन चालवा.

वाहनाची सर्व्हिस

जर तुम्ही हायवेवरून दूर कुठे जाण्याचा विचार करत असतात, तर तुम्ही तुमच्या वाहनाची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वात आधी तर वाहनाची सर्व्हिसिंग करून घ्या. जेणेकरून तुम्हाला वाहनात कुठल्याही प्रकारचा काही बिघाड असल्यास तुम्हाला तो दुरुस्त करता येईल. उदा. टायर्स, रेन वयपर्स, इंजिन आदी.

आपली प्रतिक्रिया द्या