महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळेचा राष्ट्रीय विक्रम

महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळे याने रविवारी दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवला. त्याने ही शर्यत 1.00.30 सेपंद अशी पूर्ण करीत हिंदुस्थानसाठी नव्या राष्ट्रीय विक्रमावर मोहोर उमटवली. टोकियो ऑलिम्पिकसाठी 3 हजार मीटर अडथळा शर्यतीचे तिकीट बुक करणारा अविनाश साबळे 61 मिनिटांच्या आतमध्ये हाफ मॅरेथॉन पूर्ण करणारा हिंदुस्थानचा पहिलाच धावपटू ठरलाय हे विशेष.

महाराष्ट्राच्या कालिदास हिरवे याने याआधी 1.03.46 सेपंद अशा वेळेसह हाफ मॅरेथॉन पूर्ण करीत हिंदुस्थानसाठी विक्रम नोंदवला होता, पण अविनाश साबळे याने या शर्यतीत हा विक्रम मागे टाकला. याप्रसंगी केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी अविनाश साबळे याच्या कामगिरीचे काwतुक केले. दरम्यान, श्रीनु बुगाथाने 1.04.16 सेपंद अशा वेळेसह दुसरा आणि दुर्गा बहादूर बुद्ध याने 1.04.19 सेंकद अशा वेळेसह तिसरा क्रमांक पटकावला.

n पारूल, संजीवनी, कोमलची महिला गटात बाजी
हिंदुस्थानच्या महिला धावपटूंनीही या शर्यतीत चमकदार कामगिरी केली. पारूल चौधरीने 1.12.18 सेपंद अशा वेळेसह शर्यत पूर्ण करीत सुवर्ण पदकावर नाव कोरले. संजीवनी जाधवने 1.13.00 सेपंद अशा वेळेसह रौप्य आणि कोमल जगदाळेने 1.14.04 सेपंद अशा वेळेसह कास्य पदक जिंकले.

n इथियोपियाचे वर्चस्व
दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये इथियोपियाच्या धावपटूंचेच वर्चस्व दिसून आले. पुरुष गटात अमेदेवर्प वेलेलेगन याने 58.63 सेंकद अशा वेळेसह शर्यत पूर्ण करीत सुवर्ण पदक पटकावले. बेलीहूने दुसरा आणि स्टीफन किसाने तिसरा क्रमांक पटकावला. महिला गटात येलेमजर्फ येहुअलॉ हिने 1.04.46 सेपंद अशा वेळेसह पहिल्या स्थानावर झेप घेतली. रूथ चेप्नगेतीचने दुसरा आणि अबाबेल येशनेहने तिसरा क्रमांक पटकावला.

फक्त धावपटू धावले
नवी दिल्लीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यामुळे दिल्ली हाफ मॅरेथॉनच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह होते. पण या वर्षी या शर्यतीमध्ये फक्त राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंना धावण्याची मुभा देण्यात आली. हौशी खेळाडूंना या शर्यतीत धावण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. त्यांच्यासाठी ऑनलाइन धावण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या