उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास टाळा…हे उपाय करा !

उन्हाळ्याच्या दिवसांत घामामुळे शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. याकरिता शरीर हायड्रेट राहण्याकरिता दैनंदिन आहारात काही हिरव्या पालेभाज्या आणि ऋतुमानामुसार मिळणाऱ्या फळांचा समावेश करणे गरजेचे ठरते.

टोमॅटोमध्ये अँण्टीऑक्सीडंट, जीवनसत्त्व सी, लाईकोपीन आणि इतर पोषक घटक असतात. त्यामुळे स्वास्थ्याबरोबरच त्वचेकरिताही याचा फायदा होतो. याकरिता टोमॅटो सलाड, रायता, सॅंडविच अशा पदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर करा.

टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामध्ये लायकोपीन नावाचे तत्त्व असते. या तत्त्वामुळे त्वचेचे सूर्यकिरणांपासून रक्षण होते. टरबूजाच्या बिया शिजवून खातात. या बियांमध्ये शरीराला थंडावा देण्याची क्षमता असते. त्याकरिता सकाळच्या नाश्त्यावेळी सलाडमध्ये टरबूजाच्या बिया मिसळून खाव्यात. याशिवाय टरबूजाचे जॅम, जेली आणि मोरावळा बनवूनही खाऊ शकता. टरबुजाप्रमाणेच कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.

झुकिनीमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. पाण्याचे प्रमाणही यामध्ये जास्त असते. यामध्ये असलेले जीवनसत्त्व सी शरीराची रोगप्रतिकार क्षमता उत्तम राहण्याकरिता मदत करतात. याशिवाय त्वचा आणि डोळ्यांकरिताही झुकिनी लाभदायक आहे. यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. तसेच यातील इंफ्लामेटरी गुणधर्मामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. सायंकाळच्या वेळी तयार करण्यात येणाऱ्या स्नॅक्समध्ये झुकिनी वापरू शकता. तसेच भाजी, सलाड, स्मूदी बनवतानाही स्मूदी वापरता येईल.

मक्यामध्ये फायबर, पोषक तत्त्व आणि मिनरल असतात. यातील अँण्टीऑक्सिडंटमुळे सूर्यकिरणांपासून रक्षण होते. उन्हाळ्याच्या दिवसांत मका खाल्ल्याने शरीरातील पाणी नियंत्रित राहायला मदत होते. सलाड, स्नॅक्स आणि भाज्यांमध्ये मक्याचा वापर करू शकता.

उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी झाले की, डोकेदुखी, अशक्तपणा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. याकरिता दररोज 3 ते 4 लीटर पाणी प्यावे. याशिवाय नारळपाणी , स्मूदीज, लिंबू पाणी, ज्यूसही प्यावेत. जेणेकरून शरीराला पाण्याची कमतरता जाणवणार नाही.

गर्मीमध्ये संत्र खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते. संत्र्यामध्ये जीवनसत्त्व सी आणि इतर पोषक तत्त्व असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. त्वचेलाही फायदा होतो.

हिरव्या पालेभाज्यांमध्ये मिनरल, फायबर, जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात तसेच पाणीही असते. त्यामुळे डिहायड्रेशनपासून रक्षण होते. याकरिता नियमित ब्रोकोली, कोबी, काकडीचा आहारात समावेश करावा.

चेरीमध्ये अँण्टीऑक्सीडंट, फ्लेवोनॉयड्स आणि जीवनसत्त्व सी असते. यामुळे डिहायड्रेशनचा त्रास दूर होतो.

आपली प्रतिक्रिया द्या