जम्मू-कश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, हिजबुलचा चिफ देखील निशाण्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
awantipora-jawan
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये हिंदुस्थानच्या लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील मोहीम सुरू ठेवली असून आज दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात त्यांना यश आले आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही चकमक सुरू झाली होती. दरम्यान, हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा चिफ सैफुल्ला देखील जवानांनी घेरल्याचे वृत्त येत आहे.

पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपोरा येथे दहशतवादी आणि हिंदुस्थानच्या लष्करात चकमक सुरू आहे. ब्राव बंदिना भागात दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने या ठिकाणाला घेराव घातला. दहशतवाद्यांना शरण येण्याची विनंती केली मात्र त्यांच्याकडून गोळीबार करण्यात आल्याने हिंदुस्थानी लष्कराकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.