धक्कादायक! लसीकरणामुळे अडीच महिन्याच्या बाळाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हसनाबाद

उपचाराकरीता जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात अडीच महिन्याच्या बाळाचा लसीकरणामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सतिश मनोज सोनोने असे त्या बाळाचे नाव असून लसीकरणानंतर काही वेळातच त्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. ही लस पेब्टा व्हायलीनची होती. बाळाच्या मृत्युनंतर नातेवाईक भडकले असून त्यांनी बाळाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला असूननातेवाईकांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बुधवारी सतीशची आई त्याला लसीकरणासाठी हसनाबाद (ता.भोकरदन) प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आली होती. मात्र लसीकरण झाल्यानंतर काही वेळाने बाळाची हालचाल थांबल्याचे लक्षात आले. त्यानंतर डॉक्टरांनी बाळाला तपासले असता बाळाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. मुलाचे वडील मनोज लक्ष्मण सोनोने व त्यांचे नातेवाईकांनी यावरून वैद्यकीय अधिकारी डॉ. जवेरीकर यांच्याशी वाद घातला. मात्र डॉक्टरांनी मुलाचा मृत्यू लसीकरणाने झाला नसल्याचे सांगितले. अखेर पोलिसांनी बाळाच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करून, त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संभाजीनगर येथे पाठविला आहे. तपास पोलीस जमादार चव्हाण करीत आहे.