समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुखांचे नाव द्या, एकनाथ शिंदे यांची मागणी

1010
eknath-shinde

समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि आमदार एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विधिमंडळात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

समृद्धी महामार्ग हा राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे नाव द्यावे अशी मागणी आपण केली आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.

तसेच पुढच्या तीन वर्षात समृद्धी महामार्ग पूर्ण होईल. महामार्गाचे 20-22 टक्के काम पूर्ण झाले आहे असेही शिंदे म्हणाले. हा महामार्ग पूर्ण झाल्यास मुंबई नागपूर दरम्यान 15 तासांचे अंतर आहे ते अवघ्या 6 तासांवर येईल अशी माहिती शिंदे यांनी दिली. या महामार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भाचा विकास होईल असेही शिंदे यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या