
सलामीच्या लढतीत पराभव ओढवून घेतलेल्या हिंदुस्थानचा उद्या यजमान बांगलादेशविरुद्ध दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत 0-1 फरकाने पिछाडीवर पडल्यामुळे टीम इंडियासाठी उद्या मीरपूरमध्ये अस्तित्वाची लढाई रंगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघ विजयासह मालिकेतील आव्हान जिवंत ठेवणार की पराभवासह मालिका गमाविणार याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील.
हिंदुस्थान-बांगलादेश दरम्यान सलामीचा सामना ज्या शेर ए बांगला स्टेडियमवर झाला होता, तेथेच उद्या पुन्हा उभय संघ भिडणार आहेत. या मैदानावर दोन्ही संघांच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागला होता. पहिल्या सामन्यात गोलंदाजीसाठी पोषक ठरलेली या मैदानाची खेळपट्टी बुधवारी फलंदाजीसाठी नंदनवन ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणारा संघ 280 ते 300 धावसंख्या उभारू शकतो. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर दुसऱया सामन्यात उमरान मलिकला संधी मिळण्याची शक्यता आहे.
उभय संघ
हिंदुस्थान : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, वाशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, लोकेश राहुल, रिषभ पंत, ईशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, कुलदीप सेन, शाहबाज अहमद, उमरान मलिक.
बांगलादेश : लिटन दास (कर्णधार), नजमुल हुसैन शांति, यासिर अली, आसिफ हुसैन, महामुद्दुलाह रियाद, मेहदी हसन, शाकिब अल हसन, अनामुल हक, मुशफिकुर रहीम, नुरुल हसन, इबादत हुसैन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, नासम अहमद, तस्कीन अहमद.



























































