बँक मॅनेजर महिलेची केली फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पॅनकार्ड अपडेट न केल्यास बँक खाते ब्लॉक होईल, अशी भीती दाखवून बँक मॅनेजर असलेल्या महिलेच्या खात्यावर सायबर ठगाने डल्ला मारला आहे. फसवणूकप्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार या पवई येथे राहत असून त्या एका खासगी बँकेत मॅनेजर या पदावर काम करतात. गेल्या आठवड्यात त्यांना मोबाईलवर एक मेसेज आला. त्यानंतर महिलेला एक फोन आला. फोन करणाऱ्याने तो एका सरकारी बँकेतून बोलत असल्याचे सांगून जर पॅनकार्ड अपडेट न केल्यास बँक खाते ब्लॉक होईल, अशी भीती घातली. त्यानंतर ठगाने महिलेला मोबाईलवर एक लिंक पाठवली. लिंक पाठवल्यानंतर महिलेने त्या लिंकमध्ये सर्व माहिती अपडेट केली. माहिती अपडेट केल्यानंतर महिलेच्या मोबाईलवर एक ओटीपी आला. तो ओटीपी महिलेने ठगाला शेअर केला. ओटीपी शेअर करताच महिलेच्या खात्यातून साठ हजार रुपये काढले गेले. खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात आल्यावर महिलेने बँकेच्या कस्टमर केअरला पह्न करून कार्ड ब्लॉक केले. तसेच फसवणूकप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली.