
आता बीसीसीआय कसोटी खेळणाऱया खेळाडूंवर धनवर्षाव करणार आहे. आयपीएल ही खेळाडूंसाठी सोन्याची अंडे देणारी काsंबडी असल्यामुळे या स्पर्धेसाठी फिट राहण्यासाठी अनेक क्रिकेटपटू कसोटीपासून अंतरच ठेवतात. या पार्श्वभूमीवरच ‘बीसीसीआय’ कसोटी सामन्यांचे मानधन वाढविण्याच्या तयारीत आहेत. याचबरोबर आयपीएलसाठी कसोटी क्रिकेट जाणीवपूर्वक न खेळणाऱया खेळाडूंसाठी टीम इंडियाची दारे बंद करण्याचाही ‘बीसीसीआय’ गंभीरपणे विचार करत आहे.
लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये अर्थात कसोटीत खेळाडूंना आयपीएलएवढे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळण्यासाठी खेळाडू कसोटीपासून चार हात लांबच राहतात. अशी परिस्थिती टाळण्यासाठी बीसीसीआय कसोटीसाठी मानधन वाढवण्याचा विचार करत आहे.
इशान किशनने दक्षिण आफ्रिका दौऱयावर कसोटी मालिकेतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी इशान किशनला रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याचा सल्ला दिला होता पण इशान रणजीमध्ये एकही सामना खेळला नाही. इशान किशन लाल चेंडूवरील क्रिकेटपेक्षा आयपीएलवर जास्त लक्ष पेंद्रित करत असतो, असा दावा मीडियाने सातत्याने केला आहे. यानंतर पाठदुखीमुळे इंग्लंड मालिकेतून बाहेर पडलेल्या श्रेयस अय्यरला एनसीएकडून सांगण्यात आले की, अय्यर तंदुरुस्त आहे आणि खेळण्यासाठी तयार आहे, मात्र त्यानंतर अय्यरने रणजी सामना खेळणे टाळले होते. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, जर एखाद्याने पॅलेंडर वर्षात सर्व कसोटी मालिका खेळल्या तर त्याला वार्षिक कराराशिवाय इतर बक्षीस दिले पाहिजे. खेळाडूंनी लाल चेंडूच्या क्रिकेटकडे अर्थात कसोटीकडे वळावे यासाठी हा निर्णय घेण्यासाठी ‘बीसीसीआय’कडून विचारविनिमय सुरू आहे.
आता किती मिळते मानधन
बीसीसीआयच्या करारबद्ध यादीत आता एकूण 26 खेळाडू आहेत आणि कसोटी खेळणाऱया खेळाडूंना प्रति कसोटी मानधन म्हणून 15 लाख रुपये दिले जातात. हाच आकडा वन डे खेळणाऱया खेळाडूसाठी 6 लाख आणि टी-20 साठी 3 लाख रुपये इतका आहे. हिंदुस्थानच्या करारबद्ध खेळाडूंना चार श्रेणीत विभागले असून ए प्लस श्रेणीला 7 कोटी, ए श्रेणीला 5 कोटी, बी श्रेणीला 3 कोटी तर सी श्रेणीला एक कोटी रुपये दिले जात आहेत. आता कसोटी क्रिकेट खेळणाऱयांसाठी मानधनात वाढ केली जाणार आहे.






























































