बीड जिल्हा बँक निवडणूक; महाविकास आघाडीला अपेक्षित यश, भाजपाला मोठा हादरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रदीर्घ कालावधीनंतर बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सत्तांतर होत आहे. 8 जागेसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले आहे. भाजपाने मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे भाजपाला मोठा पराभव सहन करावा लागला.

बीड जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातील 11 अर्ज बाद झाल्याने फक्त 8 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीच्या एक दिवस आधी भाजपाने निवडणुकीवर बहिष्कार घातला. निवडणूक ही एकतर्फी झाली. 8 जागांचे निकाल रविवारी दुपारपर्यंत हाती आले. यात महाविकास आघाडीने 6 जागेवर विजय मिळवला. शिवसेनेनेही 1 जागा जिंकली. प्रक्रिया मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या भाऊसाहेब नाटकर यांनी संगिता बडे यांचा पराभव केला. नाटकर यांना 42 तर संगिता बडे यांना 1 मत मिळाले. पतसंस्था मतदारसंघात राजकिशोर मोदी यांनी 93 मते घेत राष्ट्रवादीचे गंगाधरराव आगे यांचा 57 मताने पराभव केला.

भाजपाच्या अशोक लोढा यांना 1 मत मिळाले. इतर शेती मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उभे असलेले अमोल दिनकरराव आंधळे यांनी 212 मतांच्या फरकाने विजय मिळवला. या निवडणुकीत अमोल आंधळे यांनी आपले मामेभाऊ भाजपाचे धनराज राजाभाऊ मुंडे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. धनराज मुंडे यांना केवळ 9 मते मिळाले. महिला राखीव मतदारसंघात सुशिला शिवाजी पवार (भाजपा), कल्पना दिलीप शेळके (शिवसेना) यांचा विजय झाला. अनु.जाती मतदारसंघातून काँग्रेसचे रविंद्र दळवी हे 720 मते घेवून विजयी झाले. ओबीसी मतदारसंघातून कल्याण आखाडे 716 मते घेवून विजयी झाले. विमुक्त जाती मतदारसंघातून सुर्यभान मुंडे हे विजयी झाले. तब्बल 20 वर्षानंतर जिल्हा बँक भाजपाच्या ताब्यातून निसटली आहे.