
‘बेस्ट’ उपक्रमाचा 2024 -25चा 2,523.94 कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प महाव्यवस्थापक विजय सिंघल यांनी स्थायी समिती प्रशासक अर्थात पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांना सादर केला. यामध्ये बेस्ट रुळावर येण्यासाठी पालिकेने तीन हजार कोटींची मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अर्थसंकल्पानुसार बेस्टला महानगरपालिकेकडून 800 कोटी अनुदान मिळणार असल्यामुळे तूटीचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास बेस्ट उपक्रमाकडून व्यक्त करण्यात आला आहे. सन 2024 -25च्या अर्थसंकल्पात 6,872.76 कोटी रुपये महसूल अपेक्षित आहे. तर सन 2024 -25च्या अर्थसंकल्पीय वर्षांत 9,386.70 इतका खर्च अपेक्षित असल्याचे सन 2024 -25च्या अर्थसंकल्पीय वर्षांत नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली.




























































