शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना देऊन केली भगव्या सप्ताहाची सांगता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त परळी शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे शहर प्रमुख राजेश विभूते यांच्या नेतृत्वाखाली भगवा सप्ताह आयोजीत करण्यात आला होता, त्याची सांगता शिवसेना प्रमुखांना मानवंदना देवून करण्यात आली.

शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांच्या आदेशावरून जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली परळी तालुक्यात भगव्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता बुधवारी करण्यात आली. संत नरहरी महाराज मंदिर येथे सकाळी १२ वाजता शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर, जिल्हा सह संघटक रमेश चौंडे, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख अतुल दुबे, जेष्ठ नेते सतीश जगताप, युवा नेते अमर टाकळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून जमलेल्या सर्व शिवसैनिकांनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.

यावेळी अनेकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनातील खडतर प्रवास व परखड हिंदुत्ववादी विचारांवर प्रकाश टाकत आपले मनोगत उपस्थितांसमोर व्यक्त केले. भगव्या सप्ताहानिमित्त शिवसेनेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. ज्यामध्ये शहरातील मंदिरास भगव्या ध्वजाचे अर्पण, श्री वैद्यनाथ मंदिर दिशा दर्शक फलक अनावरण, गणवेश वाटप, स्वच्छता मोहीम, यासह अनेक कार्यक्रम १७ जानेवारी ते २३जानेवारी दरम्यान संपन्न झाले. हे सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यावेळी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, शहर प्रमुख राजेश विभूते, उपशहर प्रमुख मोहन राजमाने, किशन बुंदेले, वैजनाथ माने युवासेनेचे कृष्णा सुरवसे, विद्यार्थी सेनेचे अमित कचरे यांच्या सह अनिल शिंदे, अक्षय राऊत, शुभम जोशी, गजानन कोकीळ, प्रसन्न दहिवाळ, सुदर्शन यादव, तेजेश यानपल्लेवार, नवनाथ सरवदे, धनंजय मिश्रा, गोविंद जंगले, निखिल केंद्रे, तेजेश दहिवाळ, विजय लोखंडे, आकाश अंबिलवादे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.