
सामना ऑनलाईन । मुंबई
एप्रिल-मे महिन्यांतील परीक्षांचे दिवस संपल्यानंतर जून महिन्यात पुन्हा एकदा कॉलेज गजबजून गेली आहेत. नव्या वर्षासह नव्या उत्साहाने कॉलेज फुलून जातात. अशाच वातावरणात बदलापूर येथील ‘भारत कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’ची ‘टेक्नो फन फेअर’ सुरुवात होत आहे. 17 जून ते 21 जून असे पाच दिवस ही ‘टेक्नो जत्रा’ रंगणार आहे.
प्ले फुटबॉल विथ रोबोट, काऊंटर स्ट्राईक, लॅन गेमिंग, असे तात्रिंक खेळ येथे खेळता येणार आहेत. तसेच थ्रीडी पेंटिंग, वेब डिझाइनिंग आणि वर्क शॉप देखील या काळात घेण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व अॅक्टिव्हिटीत सहभागी होण्यासाठी कोणतीही फी आकारण्यात येणार नाही. त्यामुळे कुणीही अगदी सहज या टेक्नो फेअरमध्ये सहभागी होऊ शकतो. सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत या अॅक्टिव्हीटी सुरू असणार आहेत.
भारत कॉलेजच्या ‘टेक्नो फन फेअर’ विषयी आणखी माहिती हवी असल्यास 7722013121 / 7722013150 / 7722013130 या क्रमांकांवर संपर्क साधा.




























































