
>> भास्कर गिरधारी
ब्रिटिश काळात धर्मांतराद्वारे आदिवासी जनजातीची संस्कृती आणि परंपरा पुसण्याचा ख्रिश्चन मिशनऱयांनी बराच प्रयत्न केला. तो हाणून पाडत आपली संस्कृती, परंपरा आणि स्वधर्म जपण्याचे प्रयत्न बिरसा मुंडा आणि त्यांच्या अनुयायांनी कसोशीने केले. आपला देश, धर्म आणि संस्कृतीचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची प्रेरणा आपल्याला बिरसा मुंडा यांच्यापासून मिळते. यानिमित्ताने आपल्याला जनजातीतील क्रांतिकारकांचे स्मरण तीव्रतेने होते.
बिरसा मुंडा यांना भगवान म्हटले जात होते. जनजातीचा अभिमान म्हणजे भगवान बिरसा मुंडा आहे. छोटा नागपूर म्हणजे झारखंड प्रांत. त्यातील उलिहातू या गावी या सुपुत्राचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुगाना मुंडा आणि आईचे नाव करमी होते. हे अत्यंत गरीब कुटुंब होते. म्हणूनच बिरसा यांचं बालपणसुद्धा एखाद्या सर्वसामान्य जनजाती मुलासारखंच गेले. जंगलामध्ये गुरं चरायला न्यायची, बासरी वाजवायची आणि मातीमध्ये खेळायचं असंच त्यांचं आयुष्य गेलं. बिरसाचे वडील त्यांना शिकवून मोठा साहेब बनवू इच्छित होते.
त्यांच्या आई-वडिलांनी लहानग्या बिरसाला त्याच्या मामाच्या गावी पाठवून दिलं. त्या ठिकाणी गुरांना व बकऱयांना चारण्यासाठी ते जात असत. त्यांचे शिक्षक जयपाल नाग यांच्याकडून त्यांना अक्षरओळख आणि गणिताचे प्राथमिक शिक्षण मिळालं होतं. इथेच एका ख्रिस्ती धर्मप्रसारकाच्या संपका&मध्ये ते आले. शिक्षणाच्या निमित्ताने गरीब आणि भोळ्याभाबडय़ा जनजातीच्या मुलांना एकत्र आणून आपल्या ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे हे ख्रिस्ती मिशनऱयांचे काम होते. आदिवासी गरीब, दरिद्री आणि म्हणून त्यांच्या सरळसाध्या वृत्तीचा गैरफायदा घेऊन ख्रिस्ती धर्मामध्ये त्यांना ओढायचे आणि संपूर्ण हिंदुस्थानी समाजामध्ये फूट पाडून ‘पह्डा आणि झोडा’ या नीतीने राज्य करायचं ही इंग्रजांची नीती होती. ब्रिटिश ख्रिश्चनांचा हाच उद्योग होता. या शाळेत बिरसा यांनी डोक्यावर ठेवलेली शेंडी कापण्यात आली. अर्थातच या गोष्टीचा लहानग्या बिरसाच्या मनावर खूप आघात झाला. शाळेच्या वसतिगृहातसुद्धा जेवणामध्ये गाईचे मांस वाढले जात होते आणि त्यामुळे बिरसा यांनी जेवायलासुद्धा नकार दिला.
बिरसा मुंडा यांना या ख्रिश्चनांच्या षड्यंत्राचा अंदाज आला होता आणि त्यामुळे या ख्रिस्ती उपदेशकांबद्दल त्यांच्या मनामध्ये कमालीची अढी निर्माण झाली होती. बिरसाने चाइबासा येथील मिशन शाळा सोडली. दृढसंकल्प करून घरी परतलेले बिरसा मुंडा सुदैवाने त्यांचे वैष्णवपंथी आनंद पांडे यांच्या संपका&त आले. आनंद पांडे यांनी बिरसा यांना रामायण, महाभारतातल्या कथा सांगितल्या. त्याच सुमाराला ते चैतन्य महाप्रभूंच्या शिष्यांच्या संपका&त आले आणि भजन, कीर्तन, भगवतभक्तीने बिरसा अतिशय प्रभावित झाले. त्यामुळे बिरसाला आपली संस्कृती, आपला धर्म आणि आपला इतिहास यांची ओळख झाली. बिरसा यांनी मांसाहाराचा त्याग केला, डोक्यावर पांढरी पगडी परिधान केली आणि तुळशीची पूजा करायला लागले. हाच त्यांचा बिरसायत…नवा धर्म, त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि अधिकाधिक लोक बिरसा मुंडा यांच्या या नव्या धर्मात आले, त्यांचे अनुयायी झाले. मग बिरसा यांनी मुंडा तरुणांची एक संघटना स्थापन केली. सामाजिक सुधारणांच्या सोबतच राजकीय शोषणाच्या बाबतीत बिरसा मुंडा यांनी जनजागृती सुरू केली. त्या काळात पादी व सरकारी अधिकाऱयांच्या इशाऱयावर त्यांचे पित्तू असलेले जमीनदार या जनजाती बांधवांवर अत्याचार करीत असत.
बिरसा यांनी या इंग्रजांच्या षड्यंत्राच्या विरुद्ध जनजागृती केली. इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी समोर येण्याचं लोकांना आवाहन केलं. 25 ऑगस्ट 1885 रोजी बिरसा यांना छळकपटाने पोलिसांनी अटक केली आणि हजारीबाग कारागृहात आणण्यात आले. 30 नोव्हेंबर 1897 रोजी बिरसा कारागृहातून मुक्त झाल्यावर त्यांचे मन आणि हृदय आपल्या आदिवासी जनजाती भागाला स्वतंत्र करण्याच्या इच्छेने पेटून उठले. धनुष्यबाण हातामध्ये घेऊन बिरसा यांनी आंदोलन उभारण्याचा निर्धार केला. त्याचप्रमाणे इंग्रजांचे मांडलिक असलेल्या जमीनदारांना लगान न देण्याचा निश्चय केला व जमिनी मालगुजारीतून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वनाधिकार परत द्यावेत आणि ब्रिटिश राज्यकर्ते व ख्रिश्चन पादी यांनी हिंदुस्थान सोडून जावे यासाठी आंदोलन करण्याचा निश्चय केला. बिरसा यांचे मुख्य सेनापती गया मुंडा यांच्या नेतृत्वाखाली बंदगाव मिशनवर हल्ला करण्यात आला. राचीजवळच्या डोंबारी टेकडय़ांवर एक सभा आयोजित केली. या सभेत हजारो जनजाती स्त्री-पुरुष सामील झाले होते. त्यांनी कपाळावर गंधतिलक लावले होते आणि हातामध्ये लाल आणि पांढऱया पताका घेतल्या होत्या. पोलिसांना ही खबर मिळाल्यावर त्यांनी संपूर्ण डोंबारी डोंगर वेढून टाकला आणि आंदोलकांवर निर्घृण गोळीबार केला. त्याची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करावी लागेल. अंतिमतः ब्रिटिश अधिकाऱयांनी डोंबारी टेकडी ताब्यात घेतली. बिरसा यांना अटक करण्यासाठी ब्रिटिशांनी पाचशे रुपयांचे बक्षीस जाहीर केले. 3 फेब्रुवारीला फितुरी करून बंदगावमधून बिरसा यांना अटक करण्यात आली आणि हातकडय़ा घालून रांचीच्या कारागृहात आणण्यात आले. 9 जून 1900 रोजी या महान स्वातंत्र्यसैनिकाला रांचीच्या कारागृहात ठेवण्यात आले. बिरसा यांचा मृत्यू रहस्यमय होता. सरकारी नोंदीनुसार त्यांना हैजा झाल्याचे सांगण्यात आले, पण त्यांना विष देऊन ठार मारण्यात आल्याचे सांगण्यात येते. म्हणूनच त्यांचं शव गुपचूप दहन करण्यात आलं.
ब्रिटिश काळात धर्मांतराद्वारे आदिवासी जनजातीची संस्कृती आणि परंपरा पुसण्याचा ख्रिश्चन मिशनऱयांनी बराच प्रयत्न केला. तो हाणून पाडत आपली संस्कृती, परंपरा आणि स्वधर्म जपण्याचे प्रयत्न बिरसा मुंडा आणि त्यांच्या अनुयायांनी कसोशीने केले. आपला देश, धर्म आणि संस्कृतीचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची प्रेरणा आपल्याला बिरसा मुंडा यांच्यापासून मिळते. बिरसा मुंडा यांनी स्थापन केलेला धर्म बिरसायत या नावाने ओळखला जातो. या बिरसाईताची मुख्य तत्त्वे अशी आहेत की, सेवा करा, प्राणिमात्रांचे रक्षण करा, निर्व्यसनी रहा,अशुद्ध भोजन करू नका, घर स्वच्छ ठेवा, अंगणामध्ये तुळशीचे झाड लावा आणि ज्येष्ठांचा आदर करा, सत्संगामध्ये रहा, स्वतःच्या धर्मावर, आपला धर्म, संस्कृती आणि आपले पूर्वज यांच्यावर विश्वास ठेवा. एकजूट टिकवून ठेवा. आठवडय़ातून एक दिवस म्हणजे दर गुरुवारी सिंगा बोंगा या देवाची पूजा करा.
यानिमित्ताने आपल्याला जनजातीतील क्रांतिकारकांचे स्मरण तीव्रतेने होते आणि हे क्रांतिकारक शेकडो आहेत. 1857 च्या आधीपासून सुरू झालेला ब्रिटिशांविरुद्धचा हा लढा जनजाती समाजाने सदैव जागता ठेवला असे दिसते. झारखंडचा तिलका मांजी, मणिपूरचे जादो नांग, नागारानी गैदिनलियू, राजस्थानचा पुंजा भिल्ल, आंध्र प्रदेशचे अलुरी सीताराम राजू, कोमारम भीम सिद्धू कानू, वीर बुधू भगत, केरळचा पालसी राजा, तलक कल चंदू, महाराष्ट्रातील वीर राघोजी भांगरे, आसाम शंभुधन फुंगलोसा अशी ही नावे आहेत आणि बिरसा मुंडा या सगळ्यांचे प्रतीक आहे. म्हणूनच बिरसा मुंडा यांची जयंती हा जनजाती गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय पेंद्र शासनाने घेतला आहे. संपूर्ण जनजाती समाजाचा हा एका अर्थाने गौरव आहे.
(लेखक निवृत्त प्राचार्य व जनजाती विषयाचे अभ्यासक आहेत.)





























































