आज पालखी मार्गाचे भूमिपूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंढरपूर ते आळंदी आणि पंढरपूर ते देहू या पालखी मार्गाच्या कामाचे ऑनलाईन भूमिपूजन केले जाणार आहे. दिवेघाट ते मोहोळ हा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग 221 कि.मी. तर 130 कि.मी. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा पाटस ते तोंडले-बोंडले असा हा मार्ग आहे. दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीही पंढरपूर दौऱ्यावर असून ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

आषाढी वारीसाठी आळंदी आणि देहूमधून लाखो भाविक पंढरीच्या वारीसाठी येत असतात. लाखो भाविक ज्या मार्गावरून चालत येतात. तो रस्ता भव्य आणि सुंदर असावा यासाठी नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाचे विस्तारीकरण करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गा अंतर्गत दोन्ही रस्त्यांचे काम सुरू आहे. पंतप्रधानांच्या हस्ते पंढरपूरला जोडणाऱ्या इतरही अनेक महामार्गांचे लोकार्पण करणार आहेत.