
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
नवी दिल्लीतील बुरारी भागात एकाच कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह त्यांच्याच घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यातील दहा जणांचे मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळलेले असून त्यांच्या तोंडावर व डोळ्यावर पट्ट्या बांधण्यात आल्या आहेत. तर एकाचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळला आहे. मृतांमध्ये सात पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. प्रथमदर्शी या सर्वांनी एकत्र आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Bodies of 11 members of a family found in a house in Delhi’s Burari: 10 bodies were found blindfolded and hanging from a railing in the house and one body was found lying on the floor. The family owned a grocery shop- Sources pic.twitter.com/f9uIAalgRN
— ANI (@ANI) July 1, 2018
बुरारी भागातील संत नगर गल्ली क्रमांक २ मध्ये राहणाऱ्या या कुटुंबाचे त्याच परिसरात किराणा मालाचे दुकान आहे. या सर्वांची हत्या करून त्यांना तेथे लटकविण्यात आले आहे की त्या सर्वांनी एकत्र आत्महत्या केली आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.




























































