
हुक्का ओढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंबाखूवर बंदी नाही, असे नमूद करत उच्च न्यायालयाने दोन आरोपींविरोधातील गुन्हा रद्द करत दोषमुक्त केले. राजू येमूलवार व कुशल गिरधरभाई अशी या दोन आरोपींची नावे आहेत. हुक्क्याचा तंबाखू या दोघांकडे सापडला होता. पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला. या गुन्ह्यातून दोषमुक्त करावे, अशी विनंती करणारा अर्ज या दोघांनी सत्र न्यायालयात केला. सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्याविरोधात या दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
























































