बुस्टर डोस आता 6 महिन्यांनी मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
BOOSTER-DOSE

देशभरात आता 18 वर्षांवरील कोरोना लसीच्या लाभार्थ्यांना 6 महिन्यांनी बुस्टर डोस मिळणार आहे. या आधी बुस्टर डोस हा 9 महिने पूर्ण झाल्यानंतर दिला जात होता.

केंद्र सरकारच्या एनटीएजीएची स्टॅडिंग टेक्निकल सब कमिटीने कोरोनाचा दुसरा आणि कोरोनाच्या बुस्टर डोसचा कालावधी 9 महिन्यांवरून कमी करून तो 6 महिने करावा, अशी शिफारस केंद्रीय आरोग्य खात्याकडे केली होती.

त्यानुसार दुसरा डोस घेण्याचा कालावधी कमी करून तो 6 महिने करण्यात आला होता. या शिफारशीनुसार आता बुस्टर डोसचाही कालावधी कमी करण्यात येणार आहे.