बोरिवलीच्या आगीत 30 दुचाकी खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोरिवली पश्चिम एस. व्ही. रोड येथील पार्किंगमध्ये आज सायंकाळी 4 वाजता लागलेल्या आगीत 30 मोटारसायकल जळून खाक झाल्या. या आगीवर दहा मिनिटांतच नियंत्रण मिळवण्यात आल्याने सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. ही आग नेमकी का व कशी लागली याचा तपास स्थानिक पोलीस, वॉर्डचे अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारी करीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.