चारही प्रेयसी पोहोचल्या घरी, तरुणाने उचलले धक्कादायक पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये एका तरुणाच्या चार प्रेयसी होत्या. या चारही तरुणींना हा तरुण फसवत असल्याचे कळाले. या तरुणी तरुणाच्या घरी पोहोचला. तेव्हा या तरुणाला धक्काच बसला. त्याने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

पश्चिम बंगालमधील कूच बिहार जिल्ह्यात एक तरुण मेडिकलमध्ये कामाला होता. त्याच शहरात त्याच्या चार प्रेयसी होत्या. एकाचवेळी त्याचे चार तरुणींसोबत प्रेमसंबंध होते आणि या चौघींना याबद्दल माहित नव्हते.

काही दिवसांपूर्वी या तरुणींना हा तरुण फसवत असल्याचे कळाले. तेव्हा चौघींनी एकमेकींशी संपर्क साधला आणि या बद्दल शहानिशा केली. नंतर चौघीही या तरुणीच्या घरी पोहोचल्या. आपल्या चारही प्रेयसीं एकत्र पाहून तरुणाला धक्काच बसला. तरुणाच्या घरात त्याच्या प्रेयसींनी चांगलाच गोंधळ घातला. तेव्हा तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.

तरुणावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच या तरुणींनी या तरुणाविरोधात अद्याप कुठलीही तक्रार दाखल केलेली नाही.