
अनधिकृतच्या नावाखाली गरीब कुटुंबांना बेघर करणाऱया भाजप सरकारने आता थेट उत्तरकाशीमध्ये 41 मजुरांचा जीव वाचवणाऱया हीरोलाच बेघर केले आहे. दिल्ली विकास प्राधिकरणाने एक अतिक्रमण हटाव मोहीम राबवली; परंतु गेल्या वर्षी उत्तरकाशीमधील सिल्कयारा बोगद्यात जे 41 मजूर अडकले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जिवाची पर्वा न करणाऱयांपैकी एक म्हणजे रॅट-होल मायनर वकील हसन हे एक होते. कोणतीही नोटीस न देता त्यांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला असून त्यांना बेघर करण्यात आले आहे.
दिल्ली विकास प्राधिकरणाच्या कारवाईनंतर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी पेंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे, तर भाजपकडून सावध प्रतिक्रिया येत असून प्रधानमंत्री योजने अंतर्गत वकील हसन यांना घर देऊ, असे आश्वासन दिले जात आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर करत भापजवर टीका केली आहे. मोदी यांचा ‘सब का साथ, सब का विकास’ कुठे आहे? ज्यांना सन्मान मिळायला हवा होता, त्यांच्यावर अशी कारवाई केली जात आहे. वकील हसन यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता 41 मजुरांचा जीव वाचवला होता. त्या वेळी आपल्या प्रचारासाठी भाजपच्या बडय़ा बडय़ा नेत्यांनी त्यांच्या सोबत फोटो काढले होते. आता प्रचार संपला असल्याने आज त्याच वकील हसन यांना पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवण्यात आले. त्यांचे घर तोडून त्यांना बेघर करण्यात आले. हा अन्याय हेच भाजपच्या ‘अन्यायकाल’चे खरे वास्तव आहे. जनता या अन्यायाचे उत्तर देईल, अशा शब्दांत प्रियांका गांधी यांनी भाजपवर सडकून टीका केली.
कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांनी मुलांना मारहाण केली. त्यांना घराबाहेर काढले. त्यानंतर घरावर बुलडोझर चालवण्यात आला. वकील हसन, मुन्ना कुरेशी आणि माझ्या मुलांना घरात बंद करण्यात आले. आम्हाला सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये बंद केले. आम्ही आता कुठे जायचे, असा संतप्त सवाल हसन यांच्या पत्नीने केला आहे.
























































