
नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना खूशखबर आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपल्या विविध 3015 पदांसाठी भरती काढली आहे. दहावी पास आणि आयटीआय प्रमाणपत्र असलेल्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत असणार नाही, तर गुणवत्तेच्या आधारे निवड केली जाईल.
देशातील मोठय़ा प्रमाणात बेरोजगारी वाढत असून मध्य आणि पश्चिम रेल्वेने बीपीएल श्रेणीमध्ये 603, कोटा डिव्हीजनमध्ये 853, सीआरडब्ल्यूएस बीपीएलमध्ये 170, डब्ल्यूआरएस कोटामध्ये 196, मुख्यालयात 29 अशा रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. त्यानुसार उमेदवाराला indianrailways. gov.in साईटवर जाऊन 15 जानेवारीपर्यंत अर्ज करावा लागणार आहे.



























































