सीडीएस परीक्षेच्या उमेदवारांना आज लोकल प्रवासाची मुभा 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रविवार, 8 नोव्हेंबर रोजी होणाऱया कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस (सीडीएस) परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी रेल्वे मंत्रालयाने दिली असल्याचे मध्य आणि पश्चिम रेल्वेने संयुक्तपणे जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

उमेदवारांना सीडीएस परीक्षेसाठीचे ओळखपत्र दाखवून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकात प्रवेश दिला जाईल आणि तिकीट खिडक्यांवर तिकीट खरेदी करता येईल असे रेल्वेच्या सूत्रांनी म्हटले आहे. राज्य सरकारने परवानगी दिलेल्या घटकांना मास्क आणि योग्य सामाजिक अंतर राखून प्रवासास मंजुरी दिलेली आहे. त्याशिवाय सर्वसामान्य महिला वर्गाला नॉन पिकअवरमध्ये (स. 11 ते 3 आणि रा. 7 नंतर) प्रवासाची मुभा यापूर्वीच दिलेली आहे. प्रॅक्टिस करणारे वकील आणि रजिस्टर क्लार्प यांनाही ठरावीक वेळांमध्येच प्रवासाची परवानगी दिली आहे. इतर प्रवाशांनी स्थानकांवर गर्दी करू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.