लघुउद्योगाच्या करीयर संधी

अंगी असलेल्या कौशल्यांना वाव मिळावा आणि आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी व्हावे यासाठी तरुणांना मदतीची गरज असते, पण  बऱ्याचदा नोकरी करण्याची संधी मिळतेच असं नाही. घरगुती जबाबदाऱ्या, कॉलेजची वेळ न जमणे अशावेळी काही घरगुती लघुउद्योगही करता येऊ शकतात.

असलेल्या भांडवलानुसार बिस्किट बनवणे, शीतपेये, कागदी पिशव्या, पत्रावळी तयार करणे, पापड, सांडगे, मसाले बनवणे, अगरबत्ती बनवणे, घरगुती दिवाळी फराळ, फरसाण बनवणे, कानातले, इमिटेशन ज्वेलरी तयार करणे, कापडी पिशव्या, पर्सेस शिवणे, शेती व्यवसायाशी संबंधित काही लघुउद्योग अशा प्रकारचे अनेक लघु-मध्यम उद्योग घरबसल्या करता येतात. कोणीही त्यांच्या बजेटनुसार, उपलब्ध जागेत करण्यास सोपे असे व्यवसाय-उद्योग करू शकतात.

मार्गदर्शन केंद्रे

बिस्किट, शीतपेये, औषधे, सौंदर्यप्रसाधने : कमिशनर ऑफ फ्रुट अँण्ड ड्रग, वांद्रे (पूर्व)

> बेकरी आणि गिरणीसाठी : जिल्हा अन्नधान्य पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी.

> कच्च्या मालासाठी : उद्योग सहसंचालक, धर्मादाय आयुक्त भवन, वरळी.

काही लघुउद्योग

> छोटेसे वाचनालय चालवण्याचा व्यवसाय हा अनोखा उद्योग होऊ शकतो.

> घरगुती पोळी भाजी केंद्र, स्नॅक्स सेंटर सुरू करता येऊ शकते.

> निसर्गोपचाराचे रीतसर प्रशिक्षण घेऊन हा सेवाउद्योग सुरू करता येईल.

> वेबसाईट डिझाईन करणे आणि विशिष्ट प्रोग्रॅमिंग घरच्या घरी करता येते.

> पुस्तके बाइंडिंगची आवश्यकता असते. हा एक जुना लघुउद्योग आहे.

> डीटीपी, डिझाईनिंग आणि आर्टवर्कचा व्यवसायसुद्धा करता येऊ शकतो.

> भाषांतर करणे, ट्रान्सलेटरचा व्यवसायही भांडवलाशिवाय होऊ शकतो.

> मोबाईल रिपेअरिंग हा उद्योग सध्याच्या युगात तेजीत चालणारा व्यवसाय आहे.

> डे केअर सेंटरसुद्धा चांगली व्यवसाय संधी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या