परळीतील महिलेचे अपहरण करुन हैद्राबादमध्ये बलात्कार; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

शहरातील एका वीस वर्षीय विवाहितेचे आपहरण करुन तिच्यावर हैद्राबादमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या महिलेला हैद्राबादमध्ये नेऊन अडीच महिणे डांबून ठेवण्यात आले होते. सातत्याने मारहाण व शारिरीक अत्याचार केल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

परळी शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सिद्धार्थ नगर भागातील रहिवासी एका वीस वर्षीय विवाहितेचे 6 मार्च 2019 रोजी जिजामाता गार्डन समोरुन अपहरण करुन तिला हैद्राबाद येथे आरोपींनी नेले. त्यांनी पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओमधून हैद्राबादला नेल्याचे महिलेने सांगितले. तेथे एका खोलीत अडीच महिने डांबून ठेवण्यात आले. या दरम्यान लाथाबुक्क्याने मारहाण करीत सातत्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचे या पिडीत महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी स्वप्निल गुंडाळे (वय 25, रा.पद्मावती गल्ली) व राजू जाधव (वय 30, रा. सिद्धार्थ नगर) यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक के. एस. बुद्धेवार यांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आमले करीत आहेत.