राज्यमंत्री दिलीप कांबळेंविरोधात गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

‘वाईन शॉप’चा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल एक कोटी 92 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळेंसह साथीदाराविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, दिलीप कांबळे यांचा साथीदार दिलीप काळभोरचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश के.आर. चौधरी यांनी फेटाळून लावला.

कांबळे यांनी फसवणूक केल्याची तक्रार विलास चव्हाण यांनी केली होती. तक्रारदाराची ओळख आरोपी दिलीप काळभोर याच्याशी होती. दिलीप कांबळे यांच्यासह मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत ओळख असल्याचे काळभोर यांनी चव्हाण यांना सांगून दारूच्या दुकानाचा परवाना मिळवून देण्याचे आमिष चव्हाण यांना दाखवले होते. या प्रकरणात एक कोटी 92 लाख रुपये आरोपींना देण्यात आल्याची तक्रार चव्हाण यांनी केली होती.