
देशातील कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर केंद्र सरकारने परदेशी प्रवाशांसाठी नवी नियमावली लागू केली आहे. यानुसार यापुढे विमानतळावर कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या परदेशी प्रवाशांना सात दिवस होम क्वारंटाइन राहण्याची गरज नाही. मात्र सर्व प्रवाशांना 14 दिवस स्वतःच्या प्रकृतीवर लक्ष ठेवावे लागेल आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ कोरोना चाचणी करावी लागेल.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी ट्विट करून ही माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाने परदेशातून हिंदुस्थानात येणाऱया प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याचे काटेकोर पालन करा, सुरक्षित राहा आणि कोरोनाविरोधी लढय़ात हिंदुस्थानचे हात बळकट करा, असे ट्विट मांडविया यांनी केले.
परदेशी प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे
z सात दिवसांचे होम क्वारंटाइन नाही, मात्र 14 दिवस स्वतःच स्वतःच्या तब्येतीवर लक्ष ठेवावे.
z लक्षणे दिसल्यास जवळचे आरोग्य केंद्र किंवा हेल्पलाइन नंबरवर (1075) माहिती द्यावी.
z विमानतळावर 2 टक्के प्रवाशांची ‘रॅण्डमली’ चाचणी.
z प्रवासाच्या 72 तास आधी आरटी-पीसीआर रिपोर्ट अपलोड करण्याची सक्ती नाही.
z लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर आरटी-पीसीआर रिपोर्टचीही गरज नाही.




























































