
सामना ऑनलाईन । मुंबई
मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी सकाळी मंदावल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. परळ-दादर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वे वरील डाऊन दिशेने सुरू असलेली वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम हळूहळू अप दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांवर ही झालेले पाहायला मिळत आहे. सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक सुमारे 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे.

























































