ना ओटीपी दिला, ना कार्ड… तरिही सायबर चोराने क्रेडिट कार्डमधून केले पाच लाखाचे ट्रान्झॅक्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखाद्याला फोनवरून ओटीपी नंबर दिल्यानंतर खात्यातले पैसे उडाल्याचे अनेकदा ऐकले आहे. मात्र चंदिगडमध्ये एका महिलेसोबत कोणताही ओटीपी क्रमांक न देताही ऑनलाईन फ्रॉड झाल्याचे समोर आले आहे. या महिलेच्या क्रेडिट कार्डमधून सायबर गुंडांनी तब्बल 5 लाख रुपये चोरले आहेत. याबाबत महिलेने तक्रार दिली आहे. कोणतेही बँक डिटेल्स, ओटीपी न देताही ही चोरी झाल्याने आता लोकांना अधिक सतर्क रहावं लागणार आहे.

सदर महिला ही चंदिगढ मधील रामटेकची रहिवासी आहे, या महिलेकडे एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड आहे. त्या कार्डमधून 4.95 लाखांचे पेमेंट झाल्याचे समोर आले आहे. सायबर चोराने या कार्डचा वापर करून एका ट्रॅव्हल पोर्टलवर दोन पेमेंट केले. सदर महिलेचे कार्ड तिच्या जवळच होते. तसेच त्या महिलेने कुणालाही ओटीपी दिलेला नव्हता. तरीही तिच्या कार्ड मधून हे ट्रान्झॅक्शन झाले. सदर महिलेने या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढचा तपास करत आहेत.