
मिंधे गटाचे खासदार राहुल शेवाळे हे एका महिलेला घेऊन परदेशात गेले होते. या भानगडीमुळे त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आले होते असा गौप्यस्फोट करतानाच त्यावेळी या संकटातून कोणी वाचवले हे सत्य शेवाळे यांनी सर्वांसमोर सांगावे असे आव्हान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिले.
मिंधे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी काल लोकसभेत बिनबुडाचे आरोपांची राळ उडवली. त्यावर आज शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गौप्यस्फोट करत शेवाळे यांना खणखणीत प्रत्युत्तर दिले. राहुल शेवाळे हे एका महिलेला घेऊन परदेशात गेले होते. या भानगडीमुळे शेवाळे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते. मात्र शेवाळे कुटुंबात शिवसेना नेतृत्वाने समेट घडवून आणला आणि कुटुंबाची वाताहत वाचवली. शेवाळे यांना या घटनेचा विसर पडलेला दिसतो. त्यावेळी संकटातून कोणी वाचवले हे त्यांनी सांगावे असे आव्हानच खैरे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिले.
























































