
दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणी 13 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्रातून अनेक महत्त्वपूर्ण खुलासे झाले आहेत. तपास यंत्रणेनुसार, स्फोटात वापरलेली ह्युंदाई आय20 (Hyundai i20) ही कार प्रत्यक्षात एक व्हेईकल-बॉर्न इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (VBIED) होती. न्यायवैद्यक तपासणीत कारच्या ढिगाऱ्यात आणि घटनास्थळावरून जप्त केलेल्या साहित्यात टीएटीपी (TATP), अमोनियम नायट्रेट आणि पोटॅशियम नायट्रेट यांसारख्या स्फोटकांचे अंश आढळून आले आहेत.
एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, घटनास्थळावरून जप्त केलेल्या जैविक नमुन्यांच्या डीएनए चाचणीतून महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. शरीराच्या अवयवांमध्ये आणि नाकातील स्वॅबमध्ये टीएटीपी आणि अमोनियम नायट्रेटचे अंश आढळले आहेत, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. एनआयएचा (NIA) दावा आहे की, या नमुन्यांच्या डीएनए फिंगरप्रिंटिंगमधून उमर उन नबीची ओळख पटली आहे. तपास यंत्रणेनुसार, याचा अर्थ असा की स्फोटाच्या वेळी उमर उन नबी कारमध्ये उपस्थित होता.
आरोपपत्रात आणखी एका महत्त्वाच्या पुराव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तपासादरम्यान, लाल फितीने गुंडाळलेले एक कमांड मेकॅनिझम जप्त करण्यात आले. त्यावर स्फोटकांचे अंश आढळले. एनआयएच्या मते, या उपकरणाचा वापर दूरवरून किंवा कमांडद्वारे आयईडी (IED) सक्रिय करण्यासाठी केला जात होता. स्फोट झालेल्या कारजवळ हेच कमांड मेकॅनिझम सापडल्याचा दावा एजन्सीने केला आहे.
आरोपपत्रात नौगाम पोलीस स्टेशन केस क्रमांक 162/2025 चाही उल्लेख आहे. तपासादरम्यान आरोपी मुजम्मिल उर्फ ए-4 च्या फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठाबाहेरील भाड्याच्या खोलीतून स्फोटके बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू जप्त करण्यात आल्याते आरोपपत्रात म्हटले आहे. जप्त केलेल्या या वस्तू तपासणीसाठी नौगाम पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या. दरम्यान, 14 नोव्हेंबर 2025 रोजी नौगाम पोलीस ठाण्याच्या आवारात अचानक स्फोट झाला. या घटनेत नऊ पोलीस ठार झाले आणि 29 जण जखमी झाले. स्फोट इतका शक्तिशाली होता की, आजूबाजूच्या इमारतींचेही मोठे नुकसान झाले.
एनआयएच्या तपासानुसार, या संपूर्ण प्रकरणात तीन घटक महत्त्वाचे आहेत. ह्युंदाई आय20 (Hyundai i20) ही गाडी व्हीबीआयईडी (कार बॉम्ब) म्हणून वापरण्यात आली होती. गाडीतील व्यक्तीची ओळख डीएनएद्वारे उमर उन नबी म्हणून पटली. गाडीजवळ सापडलेली कमांड यंत्रणा हा एक महत्त्वाचा पुरावा आहे की आयईडी नियंत्रित पद्धतीने सक्रिय करण्यात आला होता.
जसीर बिलाल वानीने यूट्यूब आणि चॅटजीटीपीच्या माध्यमातून रॉकेट बनवण्याच्या तंत्राचा शोध घेतला होता. आरोपपत्रात असेही म्हटले आहे की, त्याने आधीच एक रॉकेट तयार केले होते, परंतु त्याची चाचणी नंतर पुढे ढकलण्यात आली. जसीर बिलाल वानीला दोन ड्रोनदेखील पुरवण्यात आले होते, जे त्याला उमर उन नावीने दिले होते.
NIA च्या म्हणण्यानुसार, स्फोटानंतर एकूण 73 वस्तू जप्त करण्यात आल्या. यापैकी 64 नमुन्यांची चाचणी चंदीगड येथील CFSL मध्ये करण्यात आली, तर उर्वरित नऊ नमुने गांधीनगर येथील NFSU मध्ये पाठवण्यात आले. दोन्ही प्रयोगशाळांमधील चाचण्यांमध्ये TATP सोबतच अमोनियम नायट्रेट आणि पोटॅशियम नायट्रेटची उपस्थिती असल्याचे निश्चित झाले.
या प्रकरणात वापरलेले प्राथमिक स्फोटक टीएटीपी असल्याचे दिसते, असे एनआयएने तज्ज्ञांच्या अहवालांच्या आधारे म्हटले आहे. तपासात अमोनियम नायट्रेटची असल्याचेही उघड झाली आहे. आरोपपत्रानुसार, टीएटीपीची स्फोटक क्षमता आणि संवेदनशीलता वाढवण्यासाठी याचा वापर केला गेला असावा.
‘मदर ऑफ सॅटन’चा वापर
या प्रकरणात वापरलेले स्फोटक टीएटीपी (TATP) होते, असे टीएटीपीला ‘मदर ऑफ सॅटन’ म्हणूनही ओळखले जाते. तपासात अमोनियम नायट्रेटची उपस्थितीही उघड झाली. आरोपपत्रानुसार, टीएटीपीची स्फोटक क्षमता आणि संवेदनशीलता वाढवण्यासाठी याचा वापर केला गेला असावा.



























































