
मंडणगड आणि खेड तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी शुक्रवार दि.११ सप्टेंबर रोजी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव पदाधिकारी आणि शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत.दोन्ही तालुक्यात संघटनात्मक बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.
दौऱ्याची सुरुवात सकाळी 11 वाजता मंडणगड येथे होणार असून, पक्षाच्या तालुकाप्रमुख निवडीसंदर्भात आयोजित बैठकीस श्री. जाधव उपस्थित राहणार आहेत. ही बैठक श्री. भाई साटम यांच्या कृपा सिंधू बंगल्यावर, बोरीचा माल, मंडणगड येथे होणार आहे.
११ सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता खेड तालुका कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक शाखाप्रमुख जनार्दन मोरे यांच्या निवासस्थानी असलेल्या सभामंडपात, मु.पो. कळंबणी आपेडे फाटा येथे होणार आहे. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा तसेच आगामी काळातील पक्षाच्या कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे.
दरम्यान, सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह, खेड येथे खेड शहरातील नागरिक तसेच शिवसैनिकांच्या गाठीभेटींचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव नागरिक व शिवसैनिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणार असून, त्यांच्या अडचणी व विविध प्रश्न जाणून घेणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने मंडणगड व खेड तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.



























































