
संगमेश्वर तालुक्यातील परचुरी-वेल्येवाडी येथील रेल्वे टनेल (बोगदा क्रमांक 182) जवळ रेल्वे ट्रॅकवर एका तरुणाचा मृतदेह आढळला. रेल्वेची जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस नोंदीनुसार, पातीराम काशिराम (30) असे मृत आढळलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (8 सप्टेंबर 2026) पहाटेच्या सुमारास परचुरी गावचे पोलीस पोलीस पाटील सुधीर सिताराम गुरव यांनी या घटनेबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात माहिती दिली. रेल्वे ट्रॅकवर परप्रांतीय तरुणाचा मृतदेह पडलेला होता. रेल्वेची धडक इतकी भीषण होती की, अपघातात तरुणाचा उजवा हात तुटला असून शरीरावर गंभीर दुखापती झाल्यामुळे अतिरक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.


























































