यंदाचा सवाई कोण? 25 जानेवारीला रंगणार चतुरंगची एकांकिका स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चतुरंग  प्रतिष्ठान आयोजित ‘सवाई’ ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला होणार आहे. त्यासाठी प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत केवळ प्रथम पारितोषिक विजेत्या एकांकिकांनाच भाग घेता येईल. स्पर्धेची प्राथमिक फेरी येत्या 7 आणि 8 जानेवारी रोजी रवींद्र नाटय़मंदिर, चौथा मजला, प्रभादेवी येथे होईल. प्राथमिक फेरीतील परीक्षकांच्या निर्णयानुसार सात एकांकिकांची अंतिम फेरी 25 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजता ते पहाटे 6 अशी रात्रभर रवींद्र नाटय़मंदिर येथे रंगणार आहे. प्रवेश अर्ज 19 डिसेंबरपासून सायंकाळी 6 ते 8 यावेळेत चतुरंग प्रतिष्ठान 302, डी/ई, माहिमकर बिल्डींग, बांगडवाडी, व्ही. पी. रोड, गिरगाव येथे उपलब्ध होईल. स्पर्धेसाठी [email protected]  या ई- मेलवर संपर्क साधून माहितीपत्र व प्रवेश अर्ज मागवता येईल.