रुग्णाच्या जिवाशी खेळणारा केमिस्ट गजाआड

कोरोनाबाधित रुग्णांना शरीरात ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यावर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या केमिस्टला गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने दिल्ली येथून अटक केली. अजय शामलाल नासा असे त्याचे नावे आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने ते बनावट इंजेक्शन बनवले होते. तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

जुलै महिन्यात युनिट 9 ने वांद्रे परिसरात सापळा रचून आझम नजीर खानला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी इंजेक्शनचे 15 बॉक्स जप्त केले. त्याने ते बॉक्स दिल्ली येथून आणल्याचे पोलिसांना सांगितले. या गुह्याचा तपास सुरु असतानाच मूळ इंजेक्शन बनवणारी कंपनी ही स्विझर्लंडची असल्याचे उघड झाले. पोलिसांनी जप्त केलेली ती इंजेक्शन बनावट असल्याचे सांगण्यात आले. पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी तपासाच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या पथकातील पोलिसांनी दिल्ली येथे जाऊन अजयला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने बनावट इंजेक्शनची कबुली दिली.

असे बनवले इंजेक्शन
अजयचे दिल्लीत औषधाचे दुकान आहे. जुलै महिन्यात त्याने गुडगाव येथून 58 हजार रुपयाचे टोकिलीझूमब इंजेक्शन खरेदी केले. त्यानंतर इंजेक्शनच्या बॉक्सचे हुबेहूब प्रिटिंग उत्तरांचल येथून करून घेतले. मूळ इंजेक्शनच्या बाटलीत पॅक केले जाते, तशा बाटल्या अजयने विकत घेतल्या. डॅक्सोना आणि डेरीफेलीन हे इंजेक्शन व डिस्टील वॉटर टाकून टोकिलीझूमब हे बनावट इंजेक्शन तयार केले.

आपली प्रतिक्रिया द्या