महाराष्ट्राचा हर्षला ठरला ‘कार’चा मानकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
harshal-chinab

सामना ऑनलाईन । मुंबई

चिनाब इलेव्हन संघाने जेतेपदाच्या लढतीत एआयसीएडी इलेव्हन संघाला पराभूत करून अखिल हिंदुस्थानी दिव्यांग इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत जेतेपदावर मोहोर उमटवली. या स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हर्षल जाधवची ‘मालिकावीर’ म्हणून निवड करण्यात आली.

बक्षिसाच्या रूपात चिनाब संघाच्या हर्षल जाधवला ‘डॅटसन’ कार देण्यात आली. चिनाब संघाने अंतिम लढतीत एआयसीएडी संघाचा 9 गडी राखून धुव्वा उडवला. या स्पर्धेत हर्षल जाधवने आपला ठसा उमटवला. त्याने पहिल्या लढतीत 31 धावा व तीन विकेटस् (हॅटट्रिक), दुसऱ्या लढतीत नाबाद 51 धावा व दोन विकेटस् आणि तिसऱ्या लढतीत नाबाद 25 धावा व चार विकेटस् घेतल्या. अंतिम सामन्यात त्याने 28 धावा व एक विकेट घेत संघाला चॅम्पियन बनवले.