
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
नेहरूंमुळे चहावाला पंतप्रधान झाल्याचे सांगणाऱ्या काँग्रेसने गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करून दाखवावाच, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला दिल्यानंतर आता काँग्रेसनेही मोदींवर चांगलाच पलटवार केला आहे. काँग्रेसने आतापर्यंत गांधी घराण्याबाहेरचे तब्बल 15 अध्यक्ष दिल्याचे प्रत्युत्तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिले आहे. इतकेच नाही तर त्यांनी या अध्यक्षांची नावेही ट्विट करत सबळ पुरावाही सादर केला आहे. चिदंबरम यांनी एकापाठोपाठ एक अशी तीन नावे ट्विट करत मोदींची बोलतीच बंद करून टाकली. ते यावरच थांबले नाहीत तर राफेल डील, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावर उत्तर देण्याचे आव्हानही मोदींना दिले आहे.
To jog PM Modi’s memory: among the Congress Presidents since 1947 were Acharya Kripalani,Pattabhi Sitaramayya,Purushottamdas Tandon,U N Dhebar,Sanjiva Reddy,Sanjivaiah,
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) November 17, 2018
Grateful that PM Modi is concerned about who is elected as Congress President and he devotes a lot of time talking about it. Will he spend half the time and speak about demonetisation, GST, Rafale, CBI and the RBI?
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) November 17, 2018
मोदींना माहीत असावे म्हणून…
मोदींना माहीत असावे म्हणून गांधी घराण्याशी संबंध नसलेल्या काँग्रेस अध्यक्षांची नावे या ठिकाणी देत असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे. 1947 नंतर आचार्य कृपलानी, पट्टाभी सीतारमैया, पुरुषोत्तम टंडन, यू. एन. बरुआ, ब्रह्मानंद रेड्डी, पी. व्ही. नरसिंह राव आणि सीताराम केसरी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री, के. कामराज आणि मनमोहन सिंग यांच्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या आणि देशासाठी मोठे योगदान दिलेल्या नेत्यांचा आम्हाला अभिमान असल्याचेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.




























































