
चॅटजीपीटीच्या मदतीने ट्रेन अपघाताची खोटी बातमी बनवणाऱ्या एकाला चीन पोलिसांनी अटक केली आहे. चॅट जीपीटीच्या साहाय्याने अपघाताची बनावट बाचमी तयार करणे, खोटी बातमी पसरवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करणे इत्यादींसाठी त्याला अटक करण्यात आली आहे.
2022मध्ये चॅटजीपीटी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित चॅटबॉट लाँच करण्यात आलं. चॅटजीपीटी हे अत्यंत धोकादायक तंत्रज्ञान आहे. हे मानवी मनाला गोंधळात टाकू शकते. कारण जेव्हा तुम्हाला यातून कोणतेही उत्तर जाणून घ्यायचे असेल, तेव्हा चुकीचे तथ्य तुमच्यासमोर ठेवलं जाऊ शकतं. त्याचा प्रत्यय हाँग नावाच्या माणसाला आला. त्याला या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
काउंटी पोलिसांना इंटरनेटवर एक बातमी दिसली. त्या बातमीत 25 एप्रिल रोजी एका ट्रेनचा भीषण अपाघात झाला आणि त्यात नऊ जण ठार झाले, अशी माहिती देण्यात आली होती. सायबर गुन्हे शाखेने याचा तपास केल्यानंतर चीनमध्ये इंटरनेट सर्च इंजिन म्हणून वापरल्या जाणाऱ्या बायडूवर 20 वेगवेगळ्या ठिकाणी ही बातमी शेअर झाल्याचं दिसून आलं. त्यावर 15 हजारहून अधिक क्लिक्स होत्या. म्हणजेच ती बातमी बऱ्यापैकी व्हायरल झाली होती.
ही बातमी पोस्ट करणाऱ्या ब्लॉगचा शोध लावून चीन पोलिसांनी हाँगला गाठलं. हाँग या कंपनीशी संबंधित ब्लॉग चालवत होता. त्याला चीन पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा कॉम्प्युटर देखील जप्त करण्यात आला आहे.
























































