समुद्रात स्कूबा डायव्हिंग करणाऱ्या महिला पर्यटकाचे घेतले चुंबन, पोलिसांनी ट्रेनरला केली अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मलेशियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. स्कूबा डायव्हिंग करणाऱ्या एका चिनी पर्यंटकासोबत ट्रेनरने छेडछाड केल्याची घटना घडली आहे. ट्रेनरने समुद्रात महिलेच्या गालावर चुंबन दिल्याचा आरोप केला असून तिने पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रेनरला अटक केली आहे.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 5 मे रोजी घडली आहे. त्या दिवशी महिला स्कूबा डायव्हिंग करायला गेली होती. दरम्यान कोणताही पर्यटक ज्यावेळी स्कूबा डायव्हिंग करायला जातो त्यावेळी त्याच्यासोबत एक ट्रेनर जातो, ज्याने तिथे काही दुर्घटना होऊ नये यासाठी. मात्र या महिलेचा ट्रेनर जरा विचित्रच निघाला. त्याने समुद्रात स्कूबा डायव्हिंग करत असताना महिलेच्या गालावर चुंबन दिले.

महिलेचा आरोप आहे की, पाण्याच्या बाहेर आल्यानंतर तो तिला त्रास देऊ लागला. ती कुठे थांबली आहे आणि कुठे जाणार आहे याची माहिती घेऊ लागला. त्यानंतर त्याने तिच्यासोबत वेळ घालवायचा आहे असेही सांगितले. त्याच्या वागण्याचा कहर झाल्याने अखेर त्या महिलेने पोलीस स्थानकात धाव घेतली. तिने त्या ट्रेनरने तिच्यासोबत छेडछाड केल्याचा आरोप लावला. पोलिसांनी त्या ट्रेनरला अटक केली आहे. ही घटना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून पर्यंटकासोबत असा व्यवहार केल्याने लोकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.