
रत्नागिरीतील एमआयडीसी परिसरात रविवारी मध्यरात्री भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. जुन्या वाद उफाळून हि घटना घडल्याची चर्चा सुरू आहे. हाणामारीत दोन्ही गटातील व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे.शिंदे गटाच्या लोकांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घराकडे धाव घेतली. यामुळे दोन्ही गट आमनेसामने आले आणि जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत मिरजोळे येथील एका युवकाच्या पाय दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या भावालाही गंभीर मारहाण करण्यात आल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. शिंदे गट आणि भाजप यांच्यातील या हाणामारीची चर्चा आज तालुक्यात सुरू होती.





























































