कोस्टल रोडचे ‘कोरोनामुक्त’ काम! एकाही कर्मचाऱ्याला लागण नाही

कोरोनाच्या दुसऱया लाटेत वेगाने रुग्णसंख्या वाढत असताना कोस्टल रोडचे काम मात्र ‘कोरोनामुक्त’ आणि वेगानेच सुरू आहे. यामध्ये कर्मचाऱयांचे लसीकरण, ‘हेल्थ ऍण्ड सेफ्टी डिव्हिजन’ आणि आवश्यक ती सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एकाही कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झालेली नाही.

मुख्यमंत्री उद्धक ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि पालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांचा प्रकास केगकान करणारा आणि काहतूककोंडीमुक्त करणाऱया कोस्टल रोडचे काम सध्या प्रगतिपथाकर आहे. 13 हजार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते करळी सी लिंकपर्यंतच्या 10.58 किमीचे काम करण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रसार वाढत असताना काम कसे होणार, असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेऊन काम सुरू असल्याची माहिती पालिका अधिकाऱयाकडून देण्यात आली.

अशी घेतली जातेय काळजी

कोस्टल रोडच्या कामात एकूण 2800 कर्मचारी, अधिकारी काम करीत आहेत. यातील 45 वयापेक्षा जास्त 376 पैकी 77.39 टक्के कर्मचाऱयांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
कोरोना खबरदारीसाठी त्याचे दररोज थर्मल स्क्रिनिंग, टेंपरेचर चेक करण्यात येत असून सॅनिटायझरचा वापर टप्प्याटप्प्यावर करण्यात येत आहे.
मास्कचा वापर, हेल्मेट, गमबूट, जॅकेट वापरली जात आहेत का यावर ‘हेल्थ ऍण्ड सेफ्टी डिव्हिजन’च्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. प्रत्येक साइटवर डॉक्टर, रुग्णवाहिकाही तैनात असते.

प्रकल्पाचे 28 टक्के काम पूर्ण

कोस्टल रोडच्या कामापैकी सध्या 28 टक्के काम पूर्ण झाले आहे. 10.58 किमीच्या या मार्गात 2.07 किमीचे दोन महाबोगदे अत्याधुनिक ‘माकळा’ टनेल बोअरिंग मशीनने खोदण्यात येत आहेत. बोगद्यांच्या कामापैकी आतापर्यंत 256 मीटर बोगदे खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या