Video सेल्फी काढण्यासाठी चाहता धावत आला, प्रसिद्ध अभिनेत्याच्या अंगावर साडली कॉफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चाहते त्यांचा आवडता सेलिब्रिटी दिसला की त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गडबड करत असतात. अनेकदा त्याचा त्रास सेलिब्रिटींना सहन करावा लागत असतो. असाच प्रकार घडला प्रसिद्ध अभिनेता अली फजलसोबत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


अली हा रेमंडच्या मोठ्या दुकानातून हातात कॉफी घेऊन बाहेर पडत होता. त्यावेळी बाहेर उभ्या असलेल्या पॅपाराझींनी त्याला पोझ द्यायला सांगितली. अली पॅपाराझींसोबत गप्पा मारतच होता की त्याचवेळी एक चाहता धावत त्याच्या जवळ आला व सेल्फी काढू लागला. त्याच्या धक्क्याने अलीच्या हातातील कॉफी त्याच्या सफेद शर्टावर सांडली.