LPG सिलेंडर 32 रुपयांनी महाग, जाणून घ्या राज्यातली किंमत

प्रातिनिधीक फोटो

इंधन कंपन्यांनी ऑक्टोबर महिन्यातील गॅसच्या किंमती जारी केल्या आहेत. त्यात LPG सिलेंडरची किंमत 32 रुपयांनी वाढवली आहे. असे असले तरी सामान्य माणसाला त्याची थेट झळ बसणार नाही. कारण इंधन कंपन्यांनी व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणार्‍या सिलेंडरची किंमत वाढवली आहे. तर अनुदानीत सिलेंडरची किंमत स्थिर आहे.

घरगुती वापरासाठी वापरली जाणारा 14.2 किलोग्रॅमची किंमत 594 रुपये आहे. तर व्यावसायिक कारणासाठी वापरल्या जाणार्‍या 19 किलोग्रॅमच्या सिलेंडरची किंमत 32 रुपयांनी वाढवली आहे. देशाच्या राजधानीत हा सिलेंडर पूर्वी 1 हजार 133.50 रुपयांना मिळत होता. आता त्याची किंमत वाढल्याने तो 1 हजार 116 रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात हा सिलेंडर  हजार 1 हजार 196 रुपयांना मिळत होता. आता त्याची किंमत वाढून 1 हजार 220 रुपयांना मिळणार आहे. चेन्नईत पूर्वे 1250 रुपयांना मिळणार हा सिलेंडर आता 1236 रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत या सिलेंडरची किंमत 1 हजार 89 रुपये होती. मुंबईत 24 रुपयांनी दर वाढला असून हा सिलेंडर आता 1 हजार 113.50 रुपयांना मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या