
सामना ऑनलाईन । गाझीपूर
बुलंद शहरातील हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोध सिंह यांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर गाझीपूरमध्ये याच घटनेची पुनरावृत्ती झाली आणि जमावाने एका पोलीस कर्मचाऱयाला ठार केले. सभेनंतर घरी जाणाऱया भाजप कार्यकर्त्यांच्या गाडीवर निषाद पार्टी आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. त्यानंतर हिंसाचार भडकला असे सांगण्यात येते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक झाली. त्यात कॉन्स्टेबल सुरेशकुमार वत्स यांचा मृत्यू झाला.



























































