घसा सुकणे, डोकेदुखी कोरोनाची नवीन लक्षणं

वारंवार घसा सुकतोय, डोकं दुखतय तर आधीच सावधा व्हा..वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या….कारण आता घसा सुकणे आणि डोकेदुखी ही कोरोनाची नवीन लक्षण समोर आली आहेत. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाची दरदिवशी नवीन लक्षणं समोर येत आहेत. जेनस्ट्रिंग डायग्नोस्टिकच्या फाऊंडर डॉक्टर गौरी अग्रवाल यांचे म्हणणे आहे की, पहिल्या लाटेपेक्षा कोरोना संक्रमीत लोकांची आताची लक्षण वेगळी आहेत. ही कोरोनाची दुसरी लाट तरुणांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे तरुणांनी जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी. लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

घसा सुखणे, उलट्या, डोळे लाल होणे आणि डोकेदुखी ही नवीन लक्षणे आहेत. त्यामुळे या दुसऱ्या लाटेत अनेक तरुणांना कोरोनाचे संक्रमण होताना दिसत आहे. यातील अनेकांना तोंड सुकणे, डोळे लाल होणे आणि डोकेदुखीच्या तक्रारी दिसून आल्या आहेत. यात तापाची लक्षणे नसतात. दरम्यान कोरोना चाचण्या वाढल्या आहेत, होम आयसोलेशनची प्रकरणं वाढली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या