चाळिशीच्या रुग्णांना कोरोनाचे टेन्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात चाळिशीच्या वयोगटातील लोकांना कोरोना संसर्गाचे अधिक टेन्शन आहे. कोरोनाने तिसऱ्या लाटेत सरासरी 44 वर्षे वयोगटातील लोकांनाच अधिक प्रमाणात गाठले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आला आहे.

आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात ओमायक्रोनने तिसरी लाट आणली. त्या अनुषंगाने आयसीएमआरने देशातील 37 प्रमुख रुग्णालयांतील डाटा गोळा केला. त्याचा अभ्यास केल्यानंतर तिसऱ्या लाटेत सर्वात जास्त तरुणांना कोरोनाने गाठल्याचे निदर्शनास आले.