विमान कंपन्यांना फटका; उत्पन्न घटले; इंडिगो एअरलाइन्सकडून पगाराला कात्री

376
indigo

जगभरातील कोरोना विषाणूच्या फैलावाचा विमान कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांत उत्पन्न मोठय़ा प्रमाणावर घटल्यामुळे कर्मचाऱयांच्या पगाराला कात्री लागली आहे. एअर इंडियापाठोपाठ आता इंडिगो एअरलाइन्सने कर्मचाऱयांच्या पगारात 25 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीचे सीईओ रोनो दत्ता यांनी गुरुवारी पगारात 5 ते 25 टक्क्यांपर्यंत कपातीचा निर्णय जाहीर केला. मी स्वतŠचा पगार 25 टक्क्यांनी कमी केला आहे. पगारकपातीमुळे आपणास कुटुंबीयांच्या गरजा भागवणे किती कठीण बनणार आहे, याची मला कल्पना आहे. परंतु कोरोना विषाणूच्या फैलावामुळे कंपनीची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. परिणामी, कंपनीचे कामकाज चालवणे मुश्किल बनले आहे, असे रोनो दत्ता यांनी कर्मचाऱयांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे.

एअर इंडियानेही घेतला निर्णय

कोरोनाच्या फैलावाचा एअर इंडियालाही फटका बसला आहे. त्यामुळे या सरकारी कंपनीने वैमानिक, केबिन क्रू मेंबर्स यांच्यासह इतर कर्मचाऱयांच्या पगार आणि भत्त्याला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या