Photo – अजबच! नोकरी सोडून जोडप्याने 2 वर्ष ‘फॅमिलीमून’ केला साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्न…विवाह… ही प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्त्वाची आणि मोठी घटना. लग्नानंतर नवविवाहीत जोडप्यांना वेध लागलेले असतात ते मधुचंद्राचे. नवरा-बायकोमधील प्रेम वाढण्यासाठी मधुचंद्राला विशेष महत्व असते. यासाठी जोडपे 15 दिवस किंवा महिनाभराची सुट्टी टाकून नयनरम्य ठिकाणी जातात. मात्र एका जोडप्याने नोकरी सोडून तब्बल दोन वर्ष मधुचंद्र साजरा केला. (सर्व फोटो – सोशल मीडिया)

familymoon-5

रॉस आणि सारा बॅरेट असे या जोडप्याचे नाव असून 2019 मध्ये दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर ते आपला मुलगा आणि कुत्र्यासोबत मधुचंद्र साजरा करण्यासाठी विदेशात निघाले. एका व्हॅनमधून हे जोडपे मधुंचंद्रासाठी निघाले आणि अनेक देश फिरून मायदेशी परतले.

familymoon-2

मधुचंद्राला जाण्यापूर्वी रॉस आणि सारा यांनी आपले घर भाड्याने दिले. यानंतर मुलगा रिली आणि कुत्र्यासोबत कॅम्पर व्हॅनच्या मदतीने मधुचंद्राला निघाले. युरोपसह फ्रान्स, स्वित्झरलँड, इटली, स्पेन, तुर्की आणि बुल्गारियासह अनेक देशांमध्ये ते फिरले. त्यांनी आपल्या या ट्रीपला ‘फॅमिलीमून’ असे नाव दिले.

familymoon-3

हे जोडपे मायदेशी परतले तेव्हा त्यांचा मुलगा पाच वर्षांचा झाला होता. मधुचंद्राला निघाले तेव्हा तो तीन वर्षांचा होता. मधुचंद्रावरून आल्यानंतर रॉयल आयुष्य जगण्यापेक्षा भटकंती करण्यावर आमचा जोर असल्याचे या जोडप्याने म्हटले.

familymoon-6

दरम्यान, रॉस हा मरीन कमांडो होता. मधुचंद्राच्या या अनुभवाबाबत सांगताना रॉस म्हणतो की, व्हॅनचा दरवाजा उघडायचो तेव्हा नवीन जागा पाहून आम्ही खूप उत्साही व्हायचो. आता कुटुंबियांसह एका अॅडव्हेंचर ट्रीपवर जाण्याचा प्लॅन असल्याचेही रॉस म्हणाला.

familymoon-1

सारा म्हणते, या दरम्यान आम्ही 13 लाख रुपये उडवले. आमची व्हॅन छोटी होती. आम्ही आतच झोपायचो मात्र जेवण बनवण्यासाठी, अंघोळ करण्यासाठी आम्हाला बाहेर पडावेच लागायचे.

familymoon